Friday 1 May 2020

सखी

आज दुपारी दारावरची बेल वाजली आणि मला इतका आनंद झाला. आजकाल बेल वाजणं दुर्मिळच झालंय. मी कधी नाही इतक्या उत्साहात दार उघडायला गेले. दार उघडून पाहते तर काय.. ती दारात उभी होती. 

माझी मैत्रीण. बरीच जुनी ओळख आमची... म्हणजे बालमैत्रीण वगैरे नाही, पण काही वर्षांपूर्वी माझी ओळख झाली तिच्याशी. ओळख सुद्धा कोणी मुद्दामून करून दिली नव्हती. माझ्याच कुठल्याशा मित्रांनी एकदा बोलण्याच्या ओघात विचारलं तू ओळखत नाहीस का तिला आणि मी म्हणाले नाही म्हणाले. ह्या दोन ओळींच्या बोलण्यात माझ्या मनात तिच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि एक दिवस खरंच आमची भेट झाली. 

मग पुढे काही दिवस, नाही पुढची काही वर्ष ती माझी खूप छान मैत्रीण झाली. वयानी बरीच मोठी होती ती पण एकदम popular . खूप मित्र मैत्रिणी होते तिला. अगदी सगळ्या वयाचे, पक्के, कच्चे. सगळ्यांशी ती त्या त्या व्यक्ती प्रमाणे वागायची. सगळे तिच्याबरोबर छान रमून जायचे. मी तिला सगळ्या गोष्टी सांगायचे आणि ती सुद्धा मन लावून माझं सगळं बोलणं ऐकायची. कुठलीही तक्रार न करता. मी बोलावलं की नेहमी मला भेटायला यायची आणि कधी तिला वाटलं तर हक्कानी येऊन बसायची गप्पा मारायला. 

नंतर मात्र माझं काळ, काम, वेग ह्याच गणित अवघड होत गेलं आणि आमचं भेटणं कमी झालं. ती तशी निवांत होती. भेटली कि तिच्याशी बोलताना वेळ कुठे जायचा कळायचंच नाही. अती व्यावसायिक जगात जपून जपून वावरताना मला असा सुद्धा वाटायला लागलं कि ह्या मैत्रिणीला मी जरा जास्तच गोष्टी सांगायला लागलीये. माझं सुख, दुःख, गुपित सगळंच.  मग मीच जरा मैत्रीत हात आखडता घ्यायला लागले. तिनी मधून मधून प्रत्यय केला यायचा पण मीच टाळायला लागले तिला. अर्थात त्रास वव्हायचा मला सुद्धा पण मी त्या वागण्याला कुठल्या कुठल्या करणॆ justify  करायचे आणि तिचा विचार डोक्यातून काढून टाकायचे. मग हळूहळू ती च येणं सुद्धा कमी झालं. तिला काय भरपूर मित्र मैत्रिणी होते. त्यांच्यात तिला माझी आठवण व्हावी इतका वेळही  झाला नसेल. 

पण आज ती अचानक अली आणि आम्ही परत तशाच भेटलो. अगदी निर्मल, स्वच्छ तिच्या हसण्यासारख्या.  खूप वर्षानंतर बोलताना कुठलेच संदर्भ धूसर झाले नाहीत कि कुठलेही स्वाभिमान जागे झाले नाहीत.  जिथे वेगळ्या झालो त्याच वळणावरून पुढे सहज एकत्र प्रवास सुरु झाला पुन्हा आमच्या मैत्रीचा. 

आता म्हणाल इतकं मैत्रीण मैत्रीण करत आहेस तर तिचं नाव तरी सांग... 
कुणासाठी ती आहे लेखन कला... 
कुणासाठी सिद्धहस्त लेखणी... 
माझी मात्र मैत्रिणीचं... माझी सखी... 


Sunday 29 April 2018

२ वर्षां नंतर

एखादा cinema मधेच leap घेतो तेव्हा मधे एक frame येते, "२ वर्षां नंतर... "
आज तसचं वाटतयं,आपलं लग्न ठरलं, झालं आणि त्यानंतर खरतरं किती गोष्टी घडल्या. आपण onsite ला आलो, छोट्या छोट्या गोष्टी celebrate केल्या, अबोला धरण्याइतके भांडलो आणि डोळ्यांत पाणी येईल इतके हसलो. स्वच्छ मनानी, एकमेकांमधे रोज नव्यानी गुंतत गेलो. अक्षरशः दृष्ट लागेल इतकं सुख अनुभवतोय आपण. कशामुळे असेल हे सारं ? कदाचित स्वतःला विसरुन एकमेकांवर प्रेम करतो आहोत म्हणून असेल. तसं प्रेम तर सगळीच couples करत असतील आणि आपल्यासारखीच सुखात असतील. ह्या बाबतीत आपण एकमेव नक्कीच नसणार. पण प्रत्येकाची गोष्ट वेगळी नक्कीच असते. तशीच आपली, ही गोष्ट. रोज नवीन पान उलटताना आपलं पुस्तक interesting होणारं हे मला स्पष्ट दिसत आहे. 

आता २ वर्षांनंतर सगळे आपल्याकडून एखाद्या mature couple सारखं वागणं expect करत असतील. More responsible आणि more focused. आपण प्रयत्न नक्कीच करतोय. पण आपण दोघं म्हणजे कळप सोडून दूसरी वाट शोधणारी छोटी कोकरं आहोत. सगळ्यांना वाटतय की आपण कळप सोडून जाऊ नये, इथेच मोठ्ठ व्हावं. जबाबदार व्हावं. आणि आपण दोघं मात्र उनाडपणे, खोडकरपणे, कळपाला नं दुखावता, हळूच दुसऱ्या वाटेनी चालायला सुरुवात केली आहे. शेवटी आहोत कोकरचं, त्यामुळे भित्रे ही आहोत. मी जरा जास्त भित्री.  पण मनातून आपल्याला खात्री की नविन वाटेवर जे काही होईल ते आपलं दोघांच explore करणं असेल, नवीन अर्थानि responsible आणि mature होणं असेल. ही वाट धरली तेव्हाच हे माहित आहे की ही वाकडी वाट शेवटी आपल्याला आपल्या कळपात नेऊन सोडणार. कदाचित त्यांच्या अपेक्षेपेक्षा छान असू आपण, किंवा जखमी सुद्धा असू. पण आपला शेवट कळपाच्या family photo मधे होणार हे ठरलेलं.

खरंतर आत्ता हे सगळं बोलायची गरज नाही. पण २ वर्षानंतर अशी frame आली तेव्हा पुढे काय ही उत्सुकता जास्त असते. झालं गेलं सगळं मागे टाकून नविन गोष्टीची ओढ लगाते. तसचं झालाय आज माझं. Hero ची वाट पाहणारी heroin झाली आहे माझी. And then as we all know, Bollywood reel life is more emotional than real life. So मी over emotional heroin चा role एकदम मस्त करते आहे. आता वेळ होत आहे hero च्या entry ची. Hero आणि heroin शिवाय cinema होणार नाही आणि २ वर्षाच्या ह्या leap ला काही अर्थही राहणार नाही.

तर पुढची गोष्ट लिहिण्याआधी हा छोटासा recap, आपल्या वाटेवरून मागे वळून पाहताना दिसणारा...



Friday 26 May 2017

सुखाचं समाधान की समाधानातलं सुखं ...

घड्याळात ६:३० वाजले तशी ती रोजच्या सारखी आवरून, दरवाज्यावर नवऱ्याची वाट पाहत उभी होती. एव्हाना त्यांच लग्न होऊन जवळजवळ ४ वर्ष झाली होती. अर्थातच त्यांच लग्न, आता काही म्हणावं तितकं नवीन राहिलेलं नव्हतं. पण ताजं मात्र नक्कीच होत. किंबहुना त्यांनी ते तसं ठेवलं होत. छोट्या छोट्या गोष्टींमधून ते दिसत होत, फुलत होत. रोज नवरा घरी यायच्या वेळेला ही तोंडावर पाणी मारून, केस-बिस आवरून फ्रेश व्हायची. गॅसवर ठेवलेला चहा उकळेपरेन्त नवऱ्याची आतुरतेने वाट पाहायची. तो ही, त्याच्या येण्याच्या वेळेनुसार घड्याळ लावावं इतका perfect वेळेला घरी यायचा आणि ही हसून त्याला Welcome करायची. तो फ्रेश होऊन येईपरेंत चहा घेऊन Gallery मध्ये सज्ज असायची. गरमागरम, वाफाळता चहा पीता-पीता गप्पा व्हायच्या आणि दोघांचा दिवसभराचा शीण सहज निघून जायचा. 
आत्ताही आतमधे गॅसवर चहा उकळत होता. कुठल्याही क्षणी तिचा नवरा आलाच असता , पण ...

पण हा कुठून आला? 'हा ... ' तिचा लग्नाआधीचा प्रियकर. एका क्षणात जवळजवळ ५ वर्ष मागे गेली ती. फोटो अल्बमची पानं उलटावी तसे त्याच्याबरोबर घालवलेले सारे क्षण तिच्या नजरेसमोर उभे राहिले. आज इतक्या वर्षांनी  तो अचानक परत कसा आला? कुठून आणि का आला असेल? तिच्या डोक्यात नको नको  त्या प्रश्नांची आणि विचारांची गर्दी झाली. पण तिचा प्रियकर मात्र मोबाईल मध्ये डोकं घालून झरझर जिना चढून वरच्या मजल्यावर गेला. त्यानी हिच्याकडे वळून पाहिलं सुद्धा नव्हतं. 'नजरचुकीनं की मुद्दामून', हिच्या मनात विचार आला. २-४ मिनिटं ती तशीच विचारात हरवली आणि तो मुलीला कडेवर घेऊन तिची बॅग सांभाळत खाली आला. जिन्यात त्यांची नजरानजर झाली.... अगदी काही क्षणांपुरतीच. तेच लाघवी हास्य मागे ठेऊन तो निघूनही गेला.

एव्हाना तिला त्याच्या येण्याचं कारण कळलं होत. आजपासून जोशी काकूंच्या पाळणाघरात जी नवीन, गोंडस मुलगी आली होती तिचा 'हा ' बाबा होता.आपल्या नवऱ्याच्या उत्कट प्रेमात, संसारात बुडालेली ती तिच्या जुन्या प्रियकराला विसरली नव्हती आणि त्याचं जगही इतकं बदललं असेल ह्याची हिनं कल्पनाही केली नव्हती.

ह्या सगळ्या विचारांमधे असतानाच तिचा नवरा घरी आला आणि आत्ताची ही ५ मिनिटं कुठल्या कुठे मागे पडली.
.
.
.

आता हे रोजचंच झालं होत. सकाळी छोटीची आई तिला पाळणाघरात सोडायची. बाल्कनी मधल्या झाडांना पाणी घालताना, ही छोटीच्या आईची रोज होणारी धावपळ पाहायची. हिला तिचं कौतुक वाटायचं. रोज संध्याकाळी ६:३० वाजता हि न चुकता दारात वाट पाहत असायची. तिघांच्याही मनातले भाव शब्दांतून नाही तर नजरेतून व्यक्त व्हायचे.

तिचा नवरा  -
वा...!!! आजही हि माझी वाट पाहतीये. खरंच कित्ती जीव लावलंय हिने. प्रेम प्रेम म्हणजे अजून काय असत?

तिचा प्रियकर  -
आजही हि दारात उभी... आता लग्न झालंय म्हणजे नवऱ्याचीच वाट पाहत असणार नक्कीच. नशीबवान आहे... निदान त्याला तरी हीच खरं प्रेम मिळतंय.

ती -
आता तो येईल ज्याच्यावर मी मनापासून खूप खूप प्रेम करते. ज्याच्या सुखी संसारात मी आकंठ बुडाली आहे. ह्याच्या आनंदातच तर माझं खरं सुखं आहे.

आता तो ही येईल. ज्याच्या आईच्या वचनात बांधली जाऊन मी त्याला सोडलं... दुखावलं... आणि आज तो इतका सुखात, आनंदात असलेला पाहतीये मी. त्याचा सुखातच माझं समाधान आहे.




Thursday 8 December 2016

निरागस प्रश्न...

१ )
आताशी तुझ्या माझ्यातला दुवा आहे चंद्र ...
कबूतरांपेक्षा जास्त fast आणि मनाच्या जवळचा ...
पण एक प्रश्न पडलाय मला ...

इथल्या अमावस्येच्या दिवशी तो गायब असतो.
तेव्हा तिकडे पौर्णिमेच्या चंद्र बनून त्याची आणि तुझी secret  meeting असते का रे ?
Boys hang -out  you know...

कारण दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा सुरु होतो त्याचा तोच जूना खेळ....
मला तुझ्या गोष्टी अजूनच भावतील अशा करून सांगायचा...

२ )
राजकन्येच्या गोष्टीत ऐकलं होत की राक्षसाचा जीव पोपटाच्या डोळ्यात असतो. तसचं सद्ध्या  माझा जीव तुझ्या हृदयात आहे अणि तुझा जीव माझ्या ...

देवाला बऱ्याचदा म्हणते  मी ... " उचल रे बाबा ... "
तेव्हा देवही बहुतेक confuse होत असेल ना ?
हिचा जीव तर ह्याच्या शरीरात आहे ... मग ह्याला उचलावे का ?
पण हा तर "देवा मला उचल" असे म्हणाला नाहीए ...

आणि हिला उचलायचे तर ह्याचा जीव न्यावा लागेल तरच हिला उचलता येईल ...

Ummm ... Complicated it is....

म्हणूनच बहुदा देव अजून तरी ह्या फंदात पडला नसावा ...
आता मलाही प्रश्न पडला आहे की इथून पुढे देवाला काय म्हणावं...

"मला उचल रे बाबा"  की  "ह्याला उचल रे बाबा "
.
.
.
.

To Be Continued...

जगात असं एखादं पुस्तक असेल का की ज्यात ह्यांची उत्तर असतील ???


Friday 2 December 2016

कदाचित नकळत

ती : जमेल ना मला गाडी शिकायला ?
तो : एकदम भारी चालवशील तू गाडी…

ती : आपलं लग्न होईल ना ?
तो :  हो गं  काका, काकू नक्की  "हो " म्हणतील आपल्या लग्नाला…

ती : ६ महिन्यात येईन ना मी परत ?
तो :  Dont Worry… नक्की येशील अणि आता आहेस मस्त परदेशात तर मजा करून घे…

ती : लग्नाच्या तयारीत काही गडबड नाही ना होणार ?
तो : मी आहे ना, मी सगळं नीट manage करतो…

ती : जमेल ना मला सगळ्यांबरोबर छान gel-up व्हायला ?
तो : अगं त्यात काय…सगळी आपलीच माणसं आहेत…एकदम बिनधास्त हो

ती : खरचं जाऊ का मी परत परदेशी ?
तो : अगं विचारतेस काय… तू हो पुढे… मी आलोच …

तिला कायमच शंका…
त्याला कायम खात्री …

त्याला खात्री आहे म्हटल्यावर ती बिनधास्त झाली …
तिच्या शंका आहेत म्हणून तो विचारी झाला …

कदाचित ह्यालाच म्हणतात पूरक असणं …
एकमेकांच्या नकळत एकमेकांच्या गुंतणे …



Sunday 5 June 2016

Love Potion

When you Look at me
I can see all my dreams in ur eyes…

When you Talk
It feels like I am listing a melodious song…

When you Hug me tight
I get whole world in my arms…

When u Kiss me
I get the most beautiful gift…

When we go for a long Drive on your bike
I enjoy safest roller-coaster ride…

When you Laugh
I see naughty boy in you…

When you Scold me
I feel  your care for me…

When you Hold my hand
I get un-said promises…

When I Look at YOU
Feels good that I have chosen u

For the love potion u have in all these…



Friday 30 October 2015

हे जमायला हवं …



आयुष्य छोट असलं तरी भरभरून जगता यायला हवं …
रडता रडता चेहऱ्यावर हसू यायला हवं …

डोळ्यांत  स्वप्न जागं ठेवता यायला हवं …
स्वप्नांच्या मागे धावताना तोल सावरता यायला हवं …

इंद्रधनुष्यासारखं ठसा उमटवता यायला हवं …
पाहणाऱ्याच्या डोळ्यांत प्रतिबिंबित होता यायला हवं …

पावसाचा थेंब बनून बरसता यायला हवं …
धबधब्यासारखं खळखळून ओसंडता यायला हवं …

गमतीच्या नात्यांत आणि नात्यांच्या गमतीत रमता यायला हवं …
आठवणींच्या खेळात हरवता यायला हवं …

गाव, देश सोडून मोकळ फिरता यायला हवं …
मातीची ओढ नं  संपणारी, त्या ओढीने परतता यायला हवं …