आयुष्यावर बोलताना ...
प्रिय श्रीयुत संदीप ,
स.न.वि.वि,.
खरं तर पत्रात तुम्हाला प्रिय म्हणं मला जास्त आवडेल, खूप मुली तुम्हाला मझयप्रमाणे “प्रिय” च मानत असतील; पण तुमचं सुखी कुटुंब प्रत्यक्ष पाहिल्यावर "प्रिय श्रीयुत " असंच म्हनाव असं वाटलं. अगदी मनापासून सांगायचं तर हा सगळा पत्रप्रपंच तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी.
काही दिवसापुर्वी तुमचा “आयुष्यावर बोलू काही ” हा कार्यक्रम परत पहिला. भरपूर मजा आली आणि नेहमीप्रमाणेच मनाला खूप खूप भावला.हा कार्यक्रम नेहमीच नवीन असतो, अगदी तुम्ही –म्हणजे संदीप आणि सलीलने जरी पैज लावून तसाच कार्यक्रम परत करायच ठरवलं तरीही ते निव्वळ अशक्य आहे आणि हेच ह्या कार्यक्रमाच विशेष आहे असं मला वाटतं. माझया सारखाच तिथे जमलेल्या मंडळीना, 3 तास कवितेतून आनंद देणं आणि "अरेरे संपले 3 तास..." असं म्हणत बाहेर पडायला लावणं ह्यातच सारं काही आलं.
तसं पाहील तर मी जुनी – नवी हिंदी, मराठी गाणी अगदी मनापासून आणि कधीही ऐकते. पण मला कवितेची आवड लागली ती आपल्यामुळे. म्हणजे आधीही कविता वाचल्या, पण त्या फक्त शाळेच्या मराठीच्या पुस्तकात आणि तेव्हा त्या कविता मार्क मिळवण्यासाठी शिकत आणि अभ्यासात होतो, पण कविता कळायला लागली ती तुमच्यामुळे. खूप अवघड आणि मोठे मोठे शब्द; यमक, प्रास जुळवून लिहिले की बनते ती कविता… हीच आमची कवितेची व्याख्या होती. पण कवितेला यमाकापेक्षाही मोठा अर्थ असतो हे कळलं तुमच्या साध्या शब्दांमधून. तशी काही मी अगदीच अरसिक नाही; ताल, सूर यांची बर्यापैकी जाण आहे मला… पण शब्दांची जाण आली ती, तुमच्या मनाला भिडनार्या कवितमुळे. सुरुवातीला मजा म्हणून आम्ही ऐकत असणार्या तुमच्या कविता कधी आमच्याशी बोलायला लागल्या तेच कळलं नई.
तुमची पहिली कविता ऐकली ती “कसे सरतील सये” आणि ही तुमची कविता आहे; हे कळलं, पुढे काही महिन्यानंतर... तुमच्या अजुन काही कविता ऐकल्यानंतर. कॅसेट कव्हर वरचा तुमचा जीन्स मधला फोटो पाहून मस्त वाटलं. कवीसुद्धा चारचौघांसारखेच राहतात हे कळलं. आमच्यासारख्या सामन्या माणसाना कशाचही कौतुक वाटुच शकतं ना… नुकत्याचा ऐकलेल्या तुमच्या कार्यक्रमात तुम्ही सांगत होतात की, तुम्ही आणि सलील कार्यक्रमाच्यावेळी लोक टाळ्या तालात वाजवतात का ते पाहून, एखादी नेमकी खुर्ची पकडता आणि तो खडक फोडून दाखवं अस एकमेकांना चॅलेंज देता… आता टाळ्यांच्याबाबतीत नाही पण शब्दांच्याबाबतीत तुम्ही माझया सारखा खडक नक्की फोडला आहे.
पण हे सारं कसं जमतं हो तुम्हाला? तुम्ही पण चारचौघासारखं बोलता, राहता, हास्यविनोद करता, पण तरीही माणसाच्या मनातल्या भावना एतक्या perfect शब्दांमध्ये व्यक्त करू शकता. तुमच्या “दमलेल्या बाबा ची कहाणी“ ह्या कवितेनं सगळ्याना रडवलं... मलाही... पण त्याहीपेक्षा माझया डोळ्यात पाणी आलं ते “दूरदेशी गेला बाबा “ ह्या कवितेनं. एक मुलगी म्हणून मी बाबाच दुक्ख समजू शकले पण जगू शकले नाही आणि कधी बाबा म्हणून जगणारं पण नाही… पण आई बाबाना दिवसभर न भेटता आल्याने जीवाची होणारी तगमग मी अनुभवली आहे. तेव्हा नेमक काय वाटायचं ते आज तुमच्या शब्दांनी सांगितलं. लहानपणी जी गोष्ट मलाही नीटशी समजली नाही ती आज तुम्ही सगळ्याना समजावली. खरं तर म्हणून... अगदी मनापासून तुम्हाला
Thanks म्हणवास वाटलं... मुलं मोठ्यां इतकं शुद्ध, स्पष्ट बोलतं नाहीत पण म्हणून त्याना काहीच कळत नाही असं समजू नये हे तुमच्या कवितेनी शिकवलं.
आज तरुणपणी तुमच्या
romantic कविता तर भन्नाट वाटतात… आणि कदाचित उद्या वर्धक्याच्या कविताही मन शांत करतील… आणि हीच तर तुमच्या शब्दांमधली जादू आहे जी परत परत आम्हाला खेचून आणते… मी काही मोठी लेखिका नाही किंवा साहित्याची मोठी अभ्यासक नाही, पण मला विचाराल तर मराठी कविताना तुम्ही नवीन रसिक मिळवून दिले आहेत. माझया माहितीत 2 प्रकारचे लोक आहेत.. 1 ज्याना तुमच्या कविता आवडतात…भावतात आणि 2 ज्याना तुमच्या कविता कळून घ्यायच्या नसतात. हो म्हणजे तुमच्या कविता अगदी सध्या सरळ असतात… पण नाहीच समजून घ्यायचं असं ठरवलं तर काय करणार ना आपण तरी... माझ फक्त इतकचं म्हणणं आहे; एकदा ह्या कविता ऐकून तर पहा.. मग त्यातली मजा कळेल आणि तुम्हीही मझयसारखा मोठ्या पात्रातून नाही पण एक छोट
Thanks नक्की म्हणाल संदीपला.
डॉक्टर माणसाची नस ओळखून उपचार करतात… तसचं तुम्ही आमचं मन ओळखता आणि त्याला व्यक्त करणार्या कविता ऐकवता… ह्यासाठी तुमचे खूप खूप आभार… धन्यवाद…!!!
आपली,
एक नम्र चाहती
ता. क
मी खूप जास्त बडबड करणारी आहे, त्यामुळे साधं धन्यवाद म्हणायला मला इतका मोठ पत्रच लिहावं लागलं.