समुद्र…
समुद्र…
कोणासाठी साधु पुरुषासारखा शांत…
कोणासाठी प्रेमिकांनी मारलेली हाक आर्त…
समुद्र…
कोणासाठी जशी राधेची कृष्णावरची प्रिती…
समुद्र…
माझ्यासाठी हे सारं काही…
पण मी फक्त विशाल म्हणते त्याला…
कोणासाठी निळशार पाणी…
कोणासाठी नारळाच्या झाडातून वाहणारया वारयाची गाणी…
समुद्र…
कोणासाठी पाण्याची अवखळ लाट…
कोणासाठी क्षितिजापरेंत पोहोचवणारी वाट…
समुद्र…
कोणासाठी साधु पुरुषासारखा शांत…
कोणासाठी प्रेमिकांनी मारलेली हाक आर्त…
कोणासाठी एक सुखद विसावा…
कोणासाठी मोरपिशी रंगाचा सुंदर पिसारा…
समुद्र…
कोणासाठी हातात न पकडता येणारी रेती… समुद्र…
माझ्यासाठी हे सारं काही…
पण मी फक्त विशाल म्हणते त्याला…