पाऊस आणि तू…
जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबात तू आहेस …
गारवा, आनंद आणि समाधान पसरवणारा …
पाऊस येतो तो तुझी आठवण घेऊनच…
तुझी आठवण घेऊन…
नभ दाटुनी आले…
तुझ्या आठवणीने मन भरून आले…
मातीचा सुगंध जणू तुझ्या कुशीत झोपून अनुभवावा…
पावसाचे थेंब तुझ्या गालावर पडावा आणि तुझ्या केसांनी तो अलगद पुसावा…
पावसात भिजताना तुझा हात हातात असावा…
दोघांच्या ओंजळीत आठवणींचा पाऊस साठवावा…
ओंजळीतल्या पाण्यात आपण एकमेकांना पाहावे…
जणू सुंदर स्वप्नांचे चित्र उलगडत जावे…
गडगडणाऱ्या नभात थंड वारे वाहतात…
कृष्ण सावल्या आकाशी तुझ्या आठवणींचे थवे उडतात…
शब्दांच्या कविता, कवितांचे सूर असेच जुळत रहावेत…
आपल्या आयुष्याच्या गाण्याचे सप्तरंगी इंद्रधनू व्हावे…