आयुष्य छोट असलं तरी भरभरून जगता यायला हवं …
रडता रडता चेहऱ्यावर हसू यायला हवं …
डोळ्यांत स्वप्न जागं ठेवता यायला हवं …
स्वप्नांच्या मागे धावताना तोल सावरता यायला हवं …
इंद्रधनुष्यासारखं ठसा उमटवता यायला हवं …
पाहणाऱ्याच्या डोळ्यांत प्रतिबिंबित होता यायला हवं …
पावसाचा थेंब बनून बरसता यायला हवं …
धबधब्यासारखं खळखळून ओसंडता यायला हवं …
गमतीच्या नात्यांत आणि नात्यांच्या गमतीत रमता यायला हवं …
आठवणींच्या खेळात हरवता यायला हवं …
गाव, देश सोडून मोकळ फिरता यायला हवं …
मातीची ओढ नं संपणारी, त्या ओढीने परतता यायला हवं …