Sunday, 29 April 2018

२ वर्षां नंतर

एखादा cinema मधेच leap घेतो तेव्हा मधे एक frame येते, "२ वर्षां नंतर... "
आज तसचं वाटतयं,आपलं लग्न ठरलं, झालं आणि त्यानंतर खरतरं किती गोष्टी घडल्या. आपण onsite ला आलो, छोट्या छोट्या गोष्टी celebrate केल्या, अबोला धरण्याइतके भांडलो आणि डोळ्यांत पाणी येईल इतके हसलो. स्वच्छ मनानी, एकमेकांमधे रोज नव्यानी गुंतत गेलो. अक्षरशः दृष्ट लागेल इतकं सुख अनुभवतोय आपण. कशामुळे असेल हे सारं ? कदाचित स्वतःला विसरुन एकमेकांवर प्रेम करतो आहोत म्हणून असेल. तसं प्रेम तर सगळीच couples करत असतील आणि आपल्यासारखीच सुखात असतील. ह्या बाबतीत आपण एकमेव नक्कीच नसणार. पण प्रत्येकाची गोष्ट वेगळी नक्कीच असते. तशीच आपली, ही गोष्ट. रोज नवीन पान उलटताना आपलं पुस्तक interesting होणारं हे मला स्पष्ट दिसत आहे. 

आता २ वर्षांनंतर सगळे आपल्याकडून एखाद्या mature couple सारखं वागणं expect करत असतील. More responsible आणि more focused. आपण प्रयत्न नक्कीच करतोय. पण आपण दोघं म्हणजे कळप सोडून दूसरी वाट शोधणारी छोटी कोकरं आहोत. सगळ्यांना वाटतय की आपण कळप सोडून जाऊ नये, इथेच मोठ्ठ व्हावं. जबाबदार व्हावं. आणि आपण दोघं मात्र उनाडपणे, खोडकरपणे, कळपाला नं दुखावता, हळूच दुसऱ्या वाटेनी चालायला सुरुवात केली आहे. शेवटी आहोत कोकरचं, त्यामुळे भित्रे ही आहोत. मी जरा जास्त भित्री.  पण मनातून आपल्याला खात्री की नविन वाटेवर जे काही होईल ते आपलं दोघांच explore करणं असेल, नवीन अर्थानि responsible आणि mature होणं असेल. ही वाट धरली तेव्हाच हे माहित आहे की ही वाकडी वाट शेवटी आपल्याला आपल्या कळपात नेऊन सोडणार. कदाचित त्यांच्या अपेक्षेपेक्षा छान असू आपण, किंवा जखमी सुद्धा असू. पण आपला शेवट कळपाच्या family photo मधे होणार हे ठरलेलं.

खरंतर आत्ता हे सगळं बोलायची गरज नाही. पण २ वर्षानंतर अशी frame आली तेव्हा पुढे काय ही उत्सुकता जास्त असते. झालं गेलं सगळं मागे टाकून नविन गोष्टीची ओढ लगाते. तसचं झालाय आज माझं. Hero ची वाट पाहणारी heroin झाली आहे माझी. And then as we all know, Bollywood reel life is more emotional than real life. So मी over emotional heroin चा role एकदम मस्त करते आहे. आता वेळ होत आहे hero च्या entry ची. Hero आणि heroin शिवाय cinema होणार नाही आणि २ वर्षाच्या ह्या leap ला काही अर्थही राहणार नाही.

तर पुढची गोष्ट लिहिण्याआधी हा छोटासा recap, आपल्या वाटेवरून मागे वळून पाहताना दिसणारा...