Sunday, 5 April 2015

Coffee आणि बरंच काही…

वेळ - office संपवून घरी जाण्याची
स्थळ - CCD 

तुझी वाट पाहत CCD मधे बसणे… जणू एक वेगळाच अनुभव…   
हो… अनुभवच  आहे  तो… दिवसभराचा थकवा विसरून… कंटाळा आला असला तरीही… तुझी ओढ जाणवत राहते…
दरवाज्यातून आत येणाऱ्या प्रत्येकात तुच असशील असं वाटत राहत…  आणि ती व्यक्ती तू नसलास की वाईट सुद्धा वाटतं …
पण हे वाटणं एका क्षणापुरताच…
कारण कुठल्याही क्षणी तू येशील ही खात्री असते…
धावपळ करत येणारा तू सतत नजरेसमोर दिसत राहतोस…
उशिरपर्येन्त मला वाट पहावी लागली तर तुला वाईट वाटतं आणि ते तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं…

आल्या आल्या sorry म्हणणारा तू…
जणू काही मी युगानुयुगं तुझी  वाट पहातीये आणि तू अत्ता येतो आहेस…  इतकी intensity असते त्या sorry मध्ये…  
कधी मला राग आलाच तर ह्या sorry नी तो पठ्ठ्या कुठे पळून जातो कुणास ठाऊक…  
मग माझंच card वापरून आपल्यासाठी एक coffee आणायची हे आपलं ठरलेलं… rather तुझं ठरलेलं…   
कधी वाफाळणारी coffee तर कधी chilled coffee with lots of ice-cream… 
आणि तुझ्यासाठी complementary  - माझ्या डोळ्यातला coffee पाहून दिसणारा आनंद …  
बास… अजून काय असतं आयुष्यात...   

Coffee पितापिता रंगलेले गप्पांचे फड… कधी चेष्टा मस्करी… तर कधी आयुष्यावर चर्चा…   
पण प्रत्येक वेळी आपल्या दोघांचा आपल्या दोघांसाठी केलेला विचार…  
जगाचा , वेळेचा, आजूबाजूच्या लोकांचा… साऱ्याचा विसर पडतो आपल्याला…  
जग ह्या क्षणाला संपलं तरी आपण एकमेकांच्या जगात असतो कायमचं… रमलेले…   

शेवटी निघताना आज खूप मज्जा आली हे आपलं दोघांच नेहमीचं वाटणं आणि वाक्य सुद्धा…  
माझ्यासाठी ती coffee best असते…  
कितीही वेळा तशी coffee प्यायलो… तरीही राहून राहून आठवतो तो ह्या coffee चा सुगंध…   

कारण ह्या coffee मध्ये असतं … coffee आणि बरंच काही… 



1 comment:

  1. Oh ... Sahhieee... Ek number.. Kya baat!! kya baat hain...

    ReplyDelete