Friday 1 May 2020

सखी

आज दुपारी दारावरची बेल वाजली आणि मला इतका आनंद झाला. आजकाल बेल वाजणं दुर्मिळच झालंय. मी कधी नाही इतक्या उत्साहात दार उघडायला गेले. दार उघडून पाहते तर काय.. ती दारात उभी होती. 

माझी मैत्रीण. बरीच जुनी ओळख आमची... म्हणजे बालमैत्रीण वगैरे नाही, पण काही वर्षांपूर्वी माझी ओळख झाली तिच्याशी. ओळख सुद्धा कोणी मुद्दामून करून दिली नव्हती. माझ्याच कुठल्याशा मित्रांनी एकदा बोलण्याच्या ओघात विचारलं तू ओळखत नाहीस का तिला आणि मी म्हणाले नाही म्हणाले. ह्या दोन ओळींच्या बोलण्यात माझ्या मनात तिच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि एक दिवस खरंच आमची भेट झाली. 

मग पुढे काही दिवस, नाही पुढची काही वर्ष ती माझी खूप छान मैत्रीण झाली. वयानी बरीच मोठी होती ती पण एकदम popular . खूप मित्र मैत्रिणी होते तिला. अगदी सगळ्या वयाचे, पक्के, कच्चे. सगळ्यांशी ती त्या त्या व्यक्ती प्रमाणे वागायची. सगळे तिच्याबरोबर छान रमून जायचे. मी तिला सगळ्या गोष्टी सांगायचे आणि ती सुद्धा मन लावून माझं सगळं बोलणं ऐकायची. कुठलीही तक्रार न करता. मी बोलावलं की नेहमी मला भेटायला यायची आणि कधी तिला वाटलं तर हक्कानी येऊन बसायची गप्पा मारायला. 

नंतर मात्र माझं काळ, काम, वेग ह्याच गणित अवघड होत गेलं आणि आमचं भेटणं कमी झालं. ती तशी निवांत होती. भेटली कि तिच्याशी बोलताना वेळ कुठे जायचा कळायचंच नाही. अती व्यावसायिक जगात जपून जपून वावरताना मला असा सुद्धा वाटायला लागलं कि ह्या मैत्रिणीला मी जरा जास्तच गोष्टी सांगायला लागलीये. माझं सुख, दुःख, गुपित सगळंच.  मग मीच जरा मैत्रीत हात आखडता घ्यायला लागले. तिनी मधून मधून प्रत्यय केला यायचा पण मीच टाळायला लागले तिला. अर्थात त्रास वव्हायचा मला सुद्धा पण मी त्या वागण्याला कुठल्या कुठल्या करणॆ justify  करायचे आणि तिचा विचार डोक्यातून काढून टाकायचे. मग हळूहळू ती च येणं सुद्धा कमी झालं. तिला काय भरपूर मित्र मैत्रिणी होते. त्यांच्यात तिला माझी आठवण व्हावी इतका वेळही  झाला नसेल. 

पण आज ती अचानक अली आणि आम्ही परत तशाच भेटलो. अगदी निर्मल, स्वच्छ तिच्या हसण्यासारख्या.  खूप वर्षानंतर बोलताना कुठलेच संदर्भ धूसर झाले नाहीत कि कुठलेही स्वाभिमान जागे झाले नाहीत.  जिथे वेगळ्या झालो त्याच वळणावरून पुढे सहज एकत्र प्रवास सुरु झाला पुन्हा आमच्या मैत्रीचा. 

आता म्हणाल इतकं मैत्रीण मैत्रीण करत आहेस तर तिचं नाव तरी सांग... 
कुणासाठी ती आहे लेखन कला... 
कुणासाठी सिद्धहस्त लेखणी... 
माझी मात्र मैत्रिणीचं... माझी सखी... 


No comments:

Post a Comment