Friday, 26 August 2011

आभाळ…

हे आभाळ छोटसं तिच्या पुरतं..
ते आभाळ दूरवर पसरलेलं

ह्या आभाळची तिच्यावर प्रचंड माया…
ते आभाळ तिच्या मायेवर जगणारं…

ह्या आभाळनी तिचं बालपण जपलायं…
ते आभाळ तिच्या बालपणाला समजूतदारपनाची किनार जोडतंय..

हे आभाळ नेहीमीच जुन्या आठवणिनी भरून आलेलं…
ते आभाळ आठवणींचा वर्षाव करून मोकळं झालेल…

ह्या आभाळात असंख्य स्वप्नांचे तारे…
ते आभाळ डोळ्यातल्या स्वप्नाना चमक देणारं…

हे आभाळ भरभरून प्रेम आणि सुख देणारं…
ते आभाळ आव्हानं आणि त्यापाठोपाठ समाधान घेऊन जागवणनार…

हे आभाळ निरांजनातल्या दिव्या सारखं शांत…
ते आभाळ पावसाच्या थेंबांसारखा बरसंनार….

हे आभाळ तिचं.. छोटसं तिच्या पुरतं…
ते आभाळ सुद्धा तिचं, तिला ओढ लावणारं…


1 comment:

  1. हे तू मराठीतून का नाही लिहीत सर्व काही ?

    ReplyDelete